महाराष्ट्र

maharashtra

चायना बाजार इमारतीला लागली आग

ETV Bharat / videos

Mumbai Fire News: झवेरी बाजार परिसरातील चायना बाजार इमारतीला लागली भीषण आग - fire in Jhaveri Bazar area

By

Published : Jun 9, 2023, 7:57 AM IST

Updated : Jun 9, 2023, 2:46 PM IST

मुंबई :मुंबईतील झवेरी बाजार येथील चायना बाजार इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. या आगीतून ५० ते ६० जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले आहे. चार तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांनी आग विझविली. आग कूलिंगची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. परंतु इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्याचा काही भाग आगीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईच्या झवेरी बाजार परिसरातील इमारतीला लागलेली आग लेवल तीनपर्यंत पोहोचली होती. ही इमारत पाचमजली होती. अचानक आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही आग का लागली, याचे कारण अजून समजू शकलेले नाही. 

Last Updated : Jun 9, 2023, 2:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details