Farmers Association Demand चंद्रकांत पाटलांवर गुन्हे दाखल करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी - पोलीसांना तात्काळ सेवेत रुजु करावे
Farmers Association Demand बुलढाणा महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मविर भाऊराव पाटील तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या बद्दल अपमापनजन भाष्य केले आहे. आणि या महापुरुषांचा अपमान केला आहे. लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून ज्यांनी या गोष्टीचा निषेध केला त्यांच्यावर दखलपात्र खोटे गुन्हे दाखल केले आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्यावर योग्य त्या प्रकारचे गुन्हे दाखल करावे. आणि निलंबीत केलेल्या पोलीसांना तात्काळ सेवेत रुजु करावे, अशी मागणी पोलिसांत करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला चपला मारो आंदोलन ही करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST