Devotee Conference : संत गजानन महाराज भक्तांचे पाचवे राज्यस्तरीय भक्त संमेलन - पाचवे राज्यस्तरीय भक्त संमेलन
अमरावती संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज भक्तांचे Sant Gajanan Maharaj Devotees पाचवे राज्यस्तरीय Fifth State Level Devotee Conference संमेलन एक ते तीन नोव्हेंबर दरम्यान अमरावतीत Amravati आयोजित करण्यात आले. एमआयडीसी लगत गानुवाडी येथे या संमेलनाची तयारी सुरू आहे. श्री संत गजानन महाराज यांचे राज्यभरातून जवळपास 15000 भाविक या भक्त संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती, आयोजन समितीचे कोषाध्यक्ष विलास पांडे यांनी 'ईटिव्ही भारत' शी बोलताना दिली. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज भक्तांच्या पाचव्या राज्यस्तरीय भक्त संमेलनाचे उद्घाटन अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते एक नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता केले जाणार आहे. Devotee Conference
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST