Nalasopara Station: नालासोपाऱ्यात स्टेशन जवळ भीषण आग, ५ दुकाने जळून खाक - नालासोपाऱ्यात स्टेशनजवळील मार्केटला भीषण आग
🎬 Watch Now: Feature Video
नालासोपारा (मुंबई)- नालासोपारा पूर्वेकडील नालासोपारा रेल्वे स्टेशन जवळील असलेल्या जाधव मार्केटला आज शनिवार (29 ऑक्टोबर)रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना जाधव मार्केटच्या तिकीट काउंटरला लागूनच घडली आहे. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये मार्केटमधील ५ दुकाने जळून खाक झाली आहेत. आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरून आगीच्या धूर दिसत होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST