Farmer Protest : शेकडो शेतकऱ्यांची तुरीची झाडे घेऊन नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक - नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालय
अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो हेक्टर तूर पिकांवर दवाड गेल्याने वायरस रोगाने तूर सुखल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तूर पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तुरीची झाडे घेऊन farmers with turi trees stormed तहसीलदार यांच्या टेबलवर टाकले. यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात Nandgaon Khandeshwar Tehsil office तहसीलदारांना एक तास घेराव Farmer Protest करून निवेदन सादर करण्यात आले. सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा न झाल्यास शेतकऱ्यांसह सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देत प्रकाश मारोटकर यांनी कृषी अधिकारी व तहसीलदार जबाबदार राहतील असे सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST