Video : 24 तासानंतर पुरातून 5 शेतकऱ्यांची सुटका; बचावक पथक ठरले देवदूत
चंद्रपूर : भात रोवणीसाठी शेतात गेलेल्या ( Chandrapur Rice Farming ) पाच शेतकऱ्यांची आज 24 तासानंतर पुरातून सुखरूप सुटका करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ( Chandrapur district Chimur ) तालुक्यात सध्या पुराने थैमान घातले आहे. याच तालुक्यातील खतोडा येथील पाच शेतकरी ट्रॅक्टरने शेतात गेले होते. भात रोवणीची कामे करीत असतानाच काल दुपारनंतर पुराचे पाणी अचानक शेतात वाढले. चारीबाजूने पाण्याने वेढा दिल्याने घाबरलेले हे शेतकरी जीव वाचवण्यासाठी ट्रॅक्टरच्या टपावर आणि लगतच्या झाडावर चढून बसले. कुणीतरी मदतीला येईल, या आशेने त्यांनी जागच्याजागी रात्र काढली. रात्रभर घरची माणसे आली नसल्याने याची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. बचाव पथकाला चंद्रपुरातून पाचारण करण्यात आले. हे पथक दुपारी पोचल्यानंतर बचावकार्य सुरू झाले. घटनास्थळी हे पाचही जण जीव मुठीत घेऊन बसले होते. ( Farmers saved By Rescue Team ) या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST