Video : बुलढाण्यात अवकाळी पावसाने हतबल करणारे नुकसान, व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी - पिकांचे नुकसान
बुलढाणा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने तब्बल 7115 शेतकऱ्यांचे 4168 हेक्टर वर पिकांचे नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यावर शेती नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून तसा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने दहा कोटी रुपयांची मदत ही मागितली आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे खामगाव आणि मलकापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहवाल तर सदर झाला मात्र आता शेतकऱ्यानं मदतीची प्रतीक्षा लागली आहे. अवकाळीने जगावे की मरावे अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना मदत तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी अधिवेशन दरम्यान विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी सभागृहात देखील केली होती. मार्च महिन्यामध्ये अवकाळी पावसाने व गारपिटीने बळीराजाला चांगलाच फटका बसला होता. यात काढणीला आलेला पिकाचे मोठे नुकसान झाले होते.