Aaditya Thackeray शेतकऱ्यांनी दिली आदित्य ठाकरे यांच्याकडे मदतीची हाक - Farmers appealed to Aditya Thackeray
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान Huge loss to farmers केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसनेचे नेते आदित्य ठाकरे Shiv Sena leader Aditya Thackeray हे आज पुण्यातील शिरूर आणि जुन्नर येथील शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिरूर तालुक्यातील मलठण येथे शेतकऱ्यांशी खाली जमिनीवर बसून संवाद साधला. त्यांनतर आदित्य ठाकरे यांनी आजूबाजूच्या गावात जाऊन शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.यावेळी वाघाळे गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जेव्हा आदित्य ठाकरे हे पाहणी करत होते तेव्हा शेतकरी ने थेट आदित्य ठाकरे यांच्या समोरच म्हणाला की साहेब आत्ता अशी परिस्थितीती झाली आहे की कुठूनही आम्हाला काहीही मदत मिळत नाहीये.शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आत्ता आत्महत्या करावं की काय अशी परिस्थितीती निर्माण झाली आहे.अस म्हणताच ठाकरे यांनी शेतकऱ्याला धीर देत अस काहीही करू नका अस म्हटल आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST