महाराष्ट्र

maharashtra

रविकांत तुपकर

ETV Bharat / videos

Elgar Rath Yatra: सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकरांनी शेगाव येथून काढली 'एल्गार रथ यात्रा'

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 10:49 PM IST

बुलडाणाElgar Rath Yatra: राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली असताना राज्य सरकारने केवळ चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. (Leader of Swabhimani Farmers Association) तर दुसरीकडे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार रथयात्रा काढली आहे. (Ravikant Tupkar) आज संतनगरी शेगाव येथून रविकांत तुपकर यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या एल्गार रथयात्रेला सुरुवात केली आहे. (soybean and cotton farmer) सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे. 19 नोव्हेंबर पर्यंतचा रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न 19 नोव्हेंबर पर्यंत सोडवले गेले नाही तर 20 नोव्हेंबरला सरकार विरोधात बुलडाणा जिल्ह्यात भव्य असा एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details