Gautami Patil Met Udayanraje Bhosale : गौतमी पाटीलने उदयनराजेंची भेट घेऊन दिले 'खास' गिफ्ट, पाहा व्हिडिओ - MP Udayanraje Bhosale
सातारा : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने साताऱ्यात येऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु, गौतमीचा घुंगरू हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. त्या संदर्भाने तिने उदयनराजेंची भेट घेतल्याचे समजते. पहिल्याच भेटीत गौतमीने खासदार उदयनराजेंना त्यांच्या आवडीची खास भेटवस्तू दिली आहे. छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटले. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे. याचा अभिमान वाटतो, असे गौतमीने सांगितले. सातारकर माझे फेव्हरेट आहेत. सातारकर मला भरभरुन प्रेम देतात. असेच भरभरुन प्रेम देत राहा, असे आवाहन करून महाराजांना परफ्यूम खूप आवडतो. त्यामुळे मी त्यांना परफ्यूम गिफ्ट केल्याचे गौतमीने सांगितले. गौतमी पाटील यांनी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे.