Anil Deshmukh : माझ्यावर खोटे आरोप; तुरुंगातून बाहेर येताच अनिल देशमुखांनी मानले न्यायालयाचे आभार - Anil deshmukh NCP
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुरुंगाबाहेर ( Anil Deshmukh out of jail ) आल्यानंतर ( Anil Deshmukh released from jail ) माध्यमांशी संवाद साधला. "परमबीर सिंग ( Parambir Singh ) यांनी माझ्यावर 100 कोटींचा खोटा आरोप केले होते. त्याच परमबीर सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सांगितले की, हे आरोप ऐकीव माहितीवर आधारीत आहेत. माझ्याकडे पुरावे नाहीत". पुढे बोलतांना देशमुख म्हणाले की, "आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला 14 महिने खूप त्रास सहन करावा लागला. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, यापुढेही विश्वास ठेवू. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे अशी प्रतिक्रीया देशमुख यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST