Rain Update : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गारपीट; शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी, पाहा व्हिडिओ - गारपीट
बीड : राज्यभरात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बीड जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज-खरबूज आणि भाजीपाला वर्गीय पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीड तालुक्यात आज अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याच होत्याचे नव्हते झाले आहे. बीड शहराजवळ असलेल्या भास्कर गिराम यांच्या शेतातील 1 एकर टरबूज आणि 1 एकर मिरची या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तर बीड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे ज्वारी, गहू, हरभरा, मिरची त्याचबरोबर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.