रामनगरच्या ढेला रेंजमध्ये हत्तीने दुचाकीस्वारांना लावले पळवून, पाहा व्हिडिओ
रामनगरच्या ढेला परिसरात वन्यप्राणी वारंवार महामार्गावर येत असतात. त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्षाचा धोका कायम आहे. एक व्हिडिओ समोर आला असून, तो तीन दुचाकीस्वारांचा आहे. खरं तर, रामनगरच्या ढेला परिसरात अचानक एक हत्ती रस्त्यावर येतो आणि बराच वेळ तिथेट घुटमळतो. दरम्यान, हत्ती जंगलाच्या दिशेने वळतो आणि तीन दुचाकीस्वार तेथून निसटण्याचा प्रयत्न करतात. पण हत्ती वळतो आणि त्यांच्या मागे धावतो. मात्र यात दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. वन्यजीव छायाचित्रकार दीप राजवार यांनी सांगितले की, हत्ती हा अतिशय संवेदनशील आणि बुद्धिमान प्राणी आहे. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा असे प्रसंग होतात तेव्हा लोक काय चूक करतात की हत्तींना वाट करुन देत नाहीत. त्यांना वाट करुन द्यायला हवी. कारण सर्वत्र हत्तींचे कॉरिडॉर आहेत आणि काही वेळाने ते स्वतः जंगलाच्या दिशेने जातात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST