महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

twin cubs of Elephant : हत्तीणीने बांदीपूरच्या जंगलात जुळ्या पिल्लांना दिला जन्म; पहा व्हिडिओ - twin cubs of Elephant

By

Published : Apr 21, 2022, 9:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

चामराजनगर (कर्नाटक) - बांदीपूरच्या जंगलात काही दिवसांपूर्वी हत्तीणीने जुळ्या ( twin cubs bandipur forest ) पिल्लांना जन्म दिला होता. हत्तीणीने पाण्याच्या तलावात जुळ्या पिल्लांना जन्म दिला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांतून या पिल्लांची सुटका केली. बांदीपूर ओल्ड सफारी सेंटरपासून 200 मीटर अंतरावर असलेल्या ( Bandipur Old Safari Center ) मुरकेरे येथे हत्तीणीने जुळ्या पिल्लांना एप्रिलमध्ये जन्म दिला होता. दुपारी अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना जंगलातील पाण्याच्या तलावात पिल्ले ( birth to twin cubs in pond ) दिसली. मात्र, पिल्लांच्या मानेपर्यंत पाणी असल्याने त्यांना उठणे कठीण ( forest department help Elephant cubs ) झाले होते. हत्तीची पिल्ले खड्ड्यांतून उठू शकली नाहीत. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून पिल्लांची सुटका केली. एका टीमने हत्तिणीला पिल्लांपासून पळविले. तर दुसऱ्या टीमने जुळ्या पिल्लांना खड्यातून बाहेर काढले. त्यानंतर हत्तीण पिल्लांना घेऊन जंगलात गेली. जुळे पिल्ले पाहून आनंद झाल्याचे वनाधिकारी रमेश कुमार ( CFO Ramesh kumar ) यांनी सांगितले. बांदीपूर जंगलात यापूर्वी 1994 मध्ये हत्तीचे जुळी पिल्ले होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details