Elephant Attack : हत्तीचा रस्त्यावरील वाहनांवर हल्ला, वन कर्मचाऱ्यांनाही पिटाळले ; Watch Video - Elephant Attack
उत्तराखंड : पौडी जिल्ह्यात हत्तींची दहशत कायम आहे. जिल्ह्याच्या लॅन्सडाऊन वनविभागातील कोटद्वार रेंज, सानेह रेंज आणि कोटरी रेंजमध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वावर वाढला आहे. हत्ती लोकवस्तीत घुसून घरांच्या आणि दुकानांच्या भिंतींचे नुकसान करत आहेत. हत्ती मार्गांवर आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. 7 ऑगस्ट रोजी दुपारी घाड परिसरातील रामडी पुलिंदा रस्त्यावर अचानक एक हत्ती आला. हत्तीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या दरम्यान वाहनचालकांनी कसेतरी वाहन सोडून आपला जीव वाचवला. यानंतर वनविभागाला हत्तीबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या पथकाने हत्तीचा जंगलाच्या दिशेने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र वनविभागाच्या वाहनामागेही हत्ती धावत सुटला. हत्तीला जंगलाकडे पिटाळण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला.