Elephant Attack हत्तीची आक्रमकता! सरकारी बसच्या काचा फोडल्या, पाहा व्हिडिओ - हत्तीचा बसवर हल्ला
इरोड जिल्हा, तामिळनाडू, कर्नाटकातील कोल्लेकल येथून 30 हून अधिक प्रवाशांना घेऊन तामिळनाडूची सरकारी बस तामिळनाडूतील सत्यमंगलम येथे जाण्यासाठी कोल्लेकल - सत्यमंगलम रस्त्यावरून जात होती. काठेसाळ या ठिकाणाजवळ आल्यावर रस्त्यावरून एक जंगली हत्ती चालत येताना दिसल्यावर चालकाने बस थांबवली. त्यानंतर रानटी हत्तीने अचानक बसच्या पुढील काचेवर आपल्या सोंडेने धडक दिल्याने समोरची संपूर्ण काच फुटून नुकसान झाले. त्यानंतर बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जंगली हत्तीने बसची काच फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.