पेन्शन घेण्याकरिता वेदनादायी संघर्ष, तुटलेल्या खुर्चीचा आधार घेत वृद्धेची बँकेत पायपीट - ओडिशा महिला पेन्शन समस्या
भुवनेश्वर: पेन्शनची रक्कम मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. कधी सरकारी बाबूगिरीमुळे जिवंतपणाचा दाखला द्यावा लागतो. तर कधी कागदपत्राअभावी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. ओडिशामध्ये पेन्शनची रक्कम मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वृद्धेचा व्हिडिओ समोर आला आहे. ओडिशाच्या नबरंगपूर येथील सूर्या हरिजन ही ७० वर्षीय महिला पेन्शनचे पैसे घेण्यासाठी भरउन्हात अनवाणी पायाने पायपीट करत आहे. वृद्ध असल्याने तिला चालता येत नाही. त्यासाठी आधार म्हणून ती तुटलेल्या खुर्चीचा आधार अनेक किलोमीटर अनवाणी पायी चालते. तिचा निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी संघर्ष पाहून अनेकांना सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल संताप वाटत आहे. स्थानिक एसबीआय व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्यांनी भत्ता वितरित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच पुढील महिन्यापासून त्याची काळजी घेतली जाईल असे सांगितले.