महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sardar Vallabhbhai Patel : सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड कार्यक्रम संपन्न - Sardar Vallabhbhai Patels birth anniversary

By

Published : Oct 31, 2022, 2:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

देशाचे दिवंगत उपप्रधानमंत्री Late Deputy Prime Minister सरदार वल्लभभाई पटेल Sardar Vallabhbhai Patel यांची आज जयंती आहे. ही जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. याच राष्ट्रीय एकता दिनाच्या National Unity Day औचित्याने, बीडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. बीड शहरातील क्रीडा संकुल येथे आज सकाळी, राज्याचे सहकार मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून एकता दौडला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँड मार्गे क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेते अविनाश साबळे यांचा पालकमंत्री अतुल सावे यांनी 5 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा,पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details