International Yoga Day 2023: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केला मुंबईत योगा दिवस साजरा, पियूष गोयल यांच्यासह राज्यपालांनी घेतला सहभाग - मुंबईत योगा दिवस साजरा
मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांनी विधानभवनात योगा दिवस साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज योगा दिनानिमीत्त योगासने केली. भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगासनांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या योग दिनाच्या कार्यक्रमाला विधान भवनात नागरिक आणि विद्यार्थी देखील आज उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्यपाल रमेश बैस व विधान परिषद विरोधी अध्यक्ष अंबादास दानवे उपस्थित होते. कोरोनानंतर पुन्हा दोन वर्षांनी मुंबईसह महाराष्ट्रात आज उत्साहात योगा दिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला विधानभवनातून यावेळी योग दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील योगा दिवस साजरा केला.