गिरीश भाऊंनी जी कबड्डी शिकले त्याचा मी अंपायर - एकनाथ खडसे - Girish Mahajan and Eknath Khadse on Kabaddi
जळगाव गिरीश भाऊ कबड्डी खेळत असताना कोणाचे पाय कसे खेचायचे हे त्यांनी उत्तमरीत्या शिकलेले आहे. मात्र गिरीश भाऊ नी जी कबड्डी शिकली त्याचा मी अंपायर राहिलेलो Umpire of Kabaddi Girish mahajan Play आहे. जोपर्यंत मी बोट वर करत नव्हतो तोपर्यंत ते आऊट होत नव्हते आणि विजयी होत नव्हते. शेवटी अंपायर अंपायर असतो आणि खेळाडू खेळाडू असतो असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांनी Girish Mahajan and Eknath Khadse on Kabaddi लगावला. परभणी येथे एका कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी मी या आधी कबड्डी खेळत होतो. त्यामुळे कोणाची टांग कशी खेचायची, मैदानाबाहेर कोणाला कसे उठवायचे हे मला माहीत आहे. असे वक्तव्य केले होते. यावर माजी मंञी एकनाथ खडसे MLA Eknath Khadse यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST