महाराष्ट्र

maharashtra

एकनाथ खडसे

ETV Bharat / videos

Gopinath Munde Death Anniversary : भ्रष्टाचाराचे आरोपी भाजपच्या मंत्रिमंडळात; पक्षाची पायाभरणी करणाऱ्यांवर अन्याय, खडसेंचा हल्लाबोल - प्रीतम मुंडे

By

Published : Jun 3, 2023, 12:17 PM IST

बीड : भ्रष्टाचाराचे आरोपी भाजपच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेत, मात्र पक्षाची पायाभरणी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भाजपने अन्याय केल्याची खरपूस टीका एकनाथ खडसे यांनी केली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर हजेरी लावली, यावेळी एकनाथ खडसे बोलत होते.  

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अनेक आठवणी आहेत. या भारतीय जनता पार्टीला मुंडे साहेबांनी संघर्ष केल्यामुळे आज चांगले दिवस आले आहेत. भाजप आता पूर्वी सारखा पक्ष राहला नाही. भाजपचे अगोदर राज्यात 2 खासदार होते, आज त्यांचे मोठ्या प्रमाणात खासदार आहेत. मात्र भाजपचा पाया घातला त्यांना भाजपकडून बाजूला केले गेले. मुंडे साहेबांनी पक्षासाठी बलिदान दिले, मात्र आज पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेना पाहिजे तेवढा सन्मान दिला जात नाही. ही खंत आज आमच्यामध्ये आहे. ज्यांचे पक्षासाठी योगदान शून्य आहे, जे बाहेरून आले आहेत, ते उच्च पदावर आहेत. ज्यांच्यावर काही आक्षेप, आरोप आहेत, ते उच्च पदावर बसले आहेत. भाजपची जी पूर्वीची प्रतिमा होती, ती आज नाही. तत्व होते ते आज नाही. मी अनेक वर्ष तिथे होतो म्हणून आज खंत वाटत असल्याचेही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ खडसे यांनी आज गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी त्यांना गोपीनाथ गडावर अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती.  

ABOUT THE AUTHOR

...view details