Eknath khadse नाथाभाऊला आणखी किती बदनाम करणार आहे, शिंदे फडणवीस सरकारला एकनाथ खडसेंचा सवाल - दूध संघाची चौकशी
जळगाव जळगाव जिल्हा दूध संघात 10 कोटीचा निधी शासनाची परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याच्या कारणावरून शासनाने याबाबत कारवाईचे आदेश दिल्याने शिंदे सरकारकडून पुन्हा मोठा धक्का मानला जात आहे. Allegation of Eknath Khadse मात्र याबाबत एकनाथ खडसे Eknath khadse यांनी दूध संघाच्या चौकशी लावून काही मिळणार नाही, दुसरं काहीतरी शोधा अशी खोचक टीका करत एकनाथ शिंदे CM eknath shinde सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान नाथाभाऊला आणखी किती बदनाम करणार असा सवाल देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला असून एकनाथ खडसे व दूध संघाच्या संचालकांना बदनाम करण्याची ही षडयंत्र असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असून दोशी असेल त्याला शिक्षा होईलच असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST