Education Officer Arrested: शिक्षणाधिकाऱ्याला पंचवीस हजाराची लाच घेताना अटक - पंचवीस हजाराची लाच घेताना अटक
सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर कारवाईचा हातोडा पडला आहे. सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या Solapur anti Bribery department पथकाने त्यांना 25 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले आहे. education officer arrested for taking bribe. किरण लोहार यांच्या सोबतच शिक्षण विभागातील एका लिपिकास ताब्यात घेण्यात आले आहे. लोहार यांनी आधी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी नंतर 25 हजार रुपये ठरले होते. आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर म्हणून ओळख असलेले रणजितसिंह डीसले यांच्या वर कारवाई केल्याने किरण लोहार राज्यभर प्रकाश झोतात आले होते. बेफाम वक्तव्य करणारे शिक्षण अधिकारी म्हणून किरण लोहार यांची ओळख होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST