महाराष्ट्र

maharashtra

हसन मुश्रीफ

ETV Bharat / videos

Hasan Mushrif Ed Raid: पुण्यात पुन्हा 9 ठिकाणी ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफ यांच्याशी कनेक्शन - Hasan Mushrif In Pune

By

Published : Apr 3, 2023, 12:55 PM IST

पुणे: ईडीकडून पुण्यात आज पुन्हा एकदा अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या साखर कारखाना मनी लॅांडरींग प्रकरणी ही छापेमारी करण्यात येत आहे. सोमवारी शहरात तब्बल नऊ ठिकाणी करण्यात येत आहे. माजी मंत्री मुश्रीफ यांच्या व्यवसायिक भागीदार असलेल्या पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी आणि कंपन्यांच्या कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात येत आहे. यात व्यवसायिक विवेक गव्हाणे, सीए जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी तसेच कार्यालयांवरही छापेमारी करण्यात करण्यात येत आहे. याआधी देखील ईडीकडून पुण्यातील या व्यावसायिकाच्या घरी तसेच कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details