Video नाशिकच्या गणेशोत्सवासाठी इकोफ्रेंडली सजावट साहित्य बाजारात दाखल, किंमतीत 15 ते 24 टक्के वाढ - गणेशोत्सवा करिता इकोफ्रेंडली सजावट
नाशिक गणेश उत्सव Ganeshotsav 2022 अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असून गणेश उत्सवा करता लागणारे साहित्य येवल्यातील बाजारात दाखल झाले असून यावेळी इको फ्रेंडली सजावट साहित्य बाजारात Eco Friendly Decoration Materials आले आहेत.गणेश उत्सव करता लागणाऱ्या सजावट साहित्य बनवण्यात येवल्यातील कारागिरी सध्या व्यस्त असून मखर, फुलांच्या माळा, पताका आदि सर्व सजावट साहित्य इको फ्रेंडली असून यात मखरच्या किंमतीत 24 ते 28 टक्क्यानी वाढ झाली आहे. तर तोरण, फुलांच्या माळा यात देखील 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून कागदापासून, पुष्ट्यापासून असे इकोफ्रेंडली सजावट साहित्य Ecofriendly decoration material विक्रीस आले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटामुळे सजावट साहित्य कडे गणेश भक्तांनी पाठ फिरवली होती. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने नक्कीच गणेश भक्तांचा इको फ्रेंडली साहित्य खरेदीकडे कल वाढताना दिसत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST