Earthquake In Bihar: बिहारच्या काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के, 4.3 रिश्टर स्केलची नोंद - Earthquake
बिहार: बिहारमध्ये आज पहाटे ५.३३ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. अररिया जिल्ह्यातील राणीगंज परिसरात धक्के जाणवले. तसेच भूकंपाचा परिणाम पूर्णिया, अररिया आणि भागलपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये झाला. या जिल्ह्यांतील लोकांना भूकंपाचे धक्के जाणवताच ते घाबरले आणि घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, कोणतीही जीवित व मालमत्तेची नुकसान झाले नाही. बिहारमधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी होती. लोकांच्या मते भूकंपाचे धक्के फक्त 10 सेकंदांसाठी जाणवले. भूकंपाचे मुख्य केंद्र अररिया जिल्ह्यातील राणीगंज असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी महिला घराबाहेर काम करत असताना अचानक मोठा आवाज ऐकून त्यांना धक्का बसला. हा धक्का फक्त 10 सेकंदाचा होता पण आवाज खूप मोठा होता. घराच्या मागे असलेल्या झोपडीच्या टिनच्या छताने मोठा आवाज आला. त्यावेळी घरात बरेच लोक झोपले होते, मात्र जे जागे होते त्यांना धक्का बसला. त्यामुळे लोक चांगलेच घाबरले आहेत. या आधीही उत्तरकाशी, उत्तराखंडमध्ये गुरुवारी पहाटे ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली होती. उत्तराखंडमध्ये गुरुवारी, IST 5:4 वाजता, उत्तरकाशीमध्ये 5 किमी खोलीवर भूकंप झाला होता. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.