Ghantanaad Andolan: दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाद आंदोलन; बॅरिकेट्स ओलांडून काही कार्यकर्त्यांचा किल्ल्यात प्रवेश, शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात - ठाकरे गटाने नेते माजी आमदार रुपेश म्हात्रे
ठाणे :आज देशभरात एकीकडे राज्यात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जात असतानाच दुसरीकडे मुस्लीम समाजामध्ये बकरी ईदचाही उत्साह दिसून येत आहे. दोन्ही समाजांकडून हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या दोन्ही सणाच्या निमित्ताने काहीसा तणाव कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी किल्ला परिसरात निर्माण झाला. यावेळी दुर्गाडी किल्ल्यासमोर मुस्लिम समाज नमाज पठण असतानाच दोन्ही गटाच्या शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन केल्याने त्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे पोलीस आणि बाचाबाची शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्याने अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी शिंदे गट व ठाकरे गट या दोन गटांकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन करून पोलिसांनी बॅरिकेट्स ओलांडून काही कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले. यावेळी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाल्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते किल्ल्याच्या परिसरात मोठ्या संख्येने जमाव जमल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करतानाच पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी काही आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष गोपाळ लांडगे व ठाकरे गटाने नेते माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी इदच्या दिवशी या ठिकाणी मुस्लीम धर्मीय मोठ्या प्रमाणावर नमाज पठण करण्यात येत असल्याने या काळात किल्ल्यावर इतरांना प्रवेश बंद ठेवण्यात आला. १९८६ साली धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाच्या शिवसेनेने किल्ल्याच्या बाहेर घंटानाद आंदोलन सुरू केले. तेव्हापासून हे आंदोलन शिवसेनेकडून केलं जात आहे. ठाकरे गटाने नेते माजी आमदार रुपेश म्हात्रे तर शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.