Video : आपच्या प्रयत्नामुळे ओमानमध्ये अडकलेल्या भारतीय महिला कामगार मायदेशी परतल्या - आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टीच्या (AAP) प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या (Indian women workers stuck in Oman) पुणेकर पुजा कसबे यांच्यासह ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या. अजून ३८ महिलांची भारतात परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम आदमी पार्टीच्या प्रयत्नामुळे ओमान देशात अडकलेल्या पुणेकर पुजा कसबे यांच्यासह ४२ घरेलू कामगार महिला भारतात परतल्या असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी दिली. तसेच अजून ३८ घरकामगार महिलांची भारतात येण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST