महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

DTC cluster bus rams two people: डीटीसी क्लस्टर बसची दोघांना धडक, एकाचा मृत्यू - डीटीसी बस की टक्कर में एक व्यक्ति की मौत

By

Published : Aug 3, 2022, 2:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) क्लस्टर बसने दोन जणांना चिरडले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला (DTC cluster bus rams two people). ही घटना द्वारका वळणावर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती. लोकांची गर्दी जमली. पोलिसांकडून मृतदेह बाजूला घेण्यात आला. या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी द्वारका एम. हर्षवर्धन म्हणाले की, स्कूटीची क्लस्टर बसला धडक बसली. ज्यामध्ये स्कूटी स्वाराचा मृत्यू झाला. मृताचे वय अंदाजे 33 वर्षे आहे. सध्या मृताची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूचा इन्कार केला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details