महाराष्ट्र

maharashtra

व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat / videos

Drunken Tractor Driver Video: मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा वाहन चालकांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल - Drunken Tractor Driver

By

Published : Jun 6, 2023, 4:18 PM IST

बुलडाणा : जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात एक मद्यधुंद ट्रॅक्टर चालक रस्त्यावर नागरिकांच्या जीवाशी खेळ करताना पाहायला मिळाला. हा व्हिडिओ पाहून हृदयाचा थरकाप उडेल असाच हा व्हिडिओ आहे. एका कार चालकाने या ट्रॅक्टरचा हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

पोलीस कारवाई करणार का? समोरून येणाऱ्या वाहनांच्या अगदी समोर हा ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर घालताना दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याचश्या वाहनांनी रस्त्याच्या खाली उतरून आपला जीव वाचवला खरा; मात्र अशा पद्धतीने बेधुंद ट्रॅक्टर चालवणाऱ्या या वाहन चालकावर वाहतूक पोलीस कारवाई करतील का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. सिंदखेडराजा शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप मेहत्रे यांनी हा व्हिडिओ पोलिसांना पाठवून कारवाईची मागणी केली आहे; मात्र अजूनही पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतलेली दिसत नाही. 

ABOUT THE AUTHOR

...view details