महाराष्ट्र

maharashtra

एच3एन2 व्हायरस

ETV Bharat / videos

H3N2 Virus Cases: एच3एन2 व्हायरसच्या रुग्णांचा खरा आकडा खूपच जास्त; सरकारकडून अजूनही टेस्टिंगच्या सूचना नाही- डॉ. अविनाश भोंडवे - Dr Avinash Bhondve said H3N2 Virus

By

Published : Mar 15, 2023, 10:38 AM IST

पुणे :कोरोनानंतर आत्ता पुन्हा एच3एन2 व्हायरसचा धोका अधिक वाढत आहे. नुकतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थेच्या अहवालानुसार यंदाच्या वर्षी पुण्यात जानेवारीपासून आत्तापर्यंत एकूण 2 हजार नमुन्यांपैकी 428 जवळजवळ 17 टक्के रुग्ण हे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातील नायडू रुग्णालयातील देखील 109 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 22 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत इंडीयन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांना विचारले असता ते म्हणाले की, हे पाहता आपल्याला वाटत आहे की याची साथ ही वाढत चालली आहे. परंतु ही आकडेवारी अतिशय क्षुल्लक असून यापेक्षा कितीतरी पटीने याचे रुग्ण हे असणार आहे. परंतु असे असले तरी आजमितीला परिस्थिती अशी आहे की, या एच3एन2 व्हायरसबाबत नक्की कोणती चाचणी करायची? याबाबतचे कुठल्याही मार्गदर्शक सूचना सरकारकडून आणि आयसीएमआरमार्फत खाजगी डॉक्टरांना देण्यात आलेल्या नाही. या व्हायरसचा त्रास हा 5 वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये जास्त आहे. तसेच याचा त्रास हा 70 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details