Diwali 2023 : फटाक्यांमध्येही विश्वचषकाची झलक, बॅट-बॉलच्या आकारातील फटाकेही आले बाजारात - bats balls crackers entered in market
Published : Nov 11, 2023, 4:24 PM IST
|Updated : Nov 11, 2023, 10:28 PM IST
पुणे Diwali 2023: सध्या भारतात विश्वचषक सुरू आहे. या विश्वचषकात भारतीय संघानं सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघानं विश्वचषक जिंकावा अशी, सर्व भारतीयांची इच्छा आहे. तर, दुसरीकडं दिवाळीमुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बाजारात बॅट, तसंच बॉलचे विविध फटाके विक्रीसाठी आले आहेत. या फटाक्यांना बच्चे कंपनीकडून चांगली मागणी असल्याचं फटाका विक्रेत्याचं म्हणनं आहे. दिवाळी म्हटलं की, लहान मुलांसाठी फटाक्याची पर्वानीच असते. लहान मुलं फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा करतात. त्यामुळं फटाक्यात देखील वेगवेगळे बदल पाहायला मिळतात. बाजारात विविध प्रकारचे फटाके दाखल झाले आहेत. त्यात बॉल, बॅटच्या फटाक्यांना चांगली पसंती मिळते आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं फटाके फोडण्यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयानं आदेश जारी केले आहेत. त्यामुळं फटाके फोडताना प्रदुषण होणार नाही यांची काळजी घेणं गरजेचं आहे.