महाराष्ट्र

maharashtra

इको फ्रेंडली आकाश कंदील

ETV Bharat / videos

Diwali २०२३ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनवले इको फ्रेंडली आकाश कंदील; पाहा व्हिडिओ - आकाश कंदील

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 9:33 PM IST

बीड Eco Friendly Aakash Kandil : दिवाळीची (Diwali 2023) खरेदी करण्यासाठी विविध बाजारात एकच गर्दी उसळली आहे. यंदाच्या वर्षी बाजारात आकर्षक असे आकाश कंदील आले आहेत. नागरिक दिवाळीनिमित (Diwali Festival) बाजारात पणती, दिवे आणि आकाश कंदील अशा वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. तर आजपासून दिवाळीला सुरूवात झाली आहे. सध्या धावपळीच्या युगामध्ये कुणालाही आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र, बीडच्या आदित्य महाविद्यालयात (Aditya Mahavidyalaya Beed) विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त गुण दाखवण्यासाठी 'इको फ्रेंडली आकाश कंदील' बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून आकाश कंदील (Aakash Kandil) बनवला आहे. भारतीय संस्कृती जपण्यासाठी व पर्यावरणाला पूरक व कमी खर्चात हे कंदील विद्यार्थ्यांनी बनवले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details