महाराष्ट्र

maharashtra

श्री गणेश मंदिर देवस्थान परिसरात विद्युत रोषणाई

ETV Bharat / videos

Shri Ganesh Mandir in Dombivali : श्री गणेश मंदिराचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष, देवस्थानाचा परिसर विद्युत रोषणाईनं उजळला; पाहा व्हिडिओ - श्री गणेश मंदिर देवस्थान

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 1:17 PM IST

मुंबई (ठाणे) Shri Ganesh Mandir :डोंबिवलीच्या फडके रोड परिसरात दरवर्षी मनसे आमदार राजू पाटील यांच्या संकल्पनेतून विद्युत रोषणाई केली जाते. यंदा डोंबिवलीच्या प्रसिद्ध श्री गणेश मंदिर देवस्थानच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मंदिर परिसराल देखील आकर्षक विद्युत रोषणाई मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीनं करण्यात आली आहे.  फडके रोड परिसर आणि मंदिर परिसर हे विद्युत रोषणाईनं उजळला आहे.  यंदा श्री गणेश मंदिराचा शतक महोत्सव असल्यामुळं राजू पाटील यांनी मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी देवस्थानसमितीनं देखील तात्काळ मान्यता दिली.  मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त राहुलजी दामले यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईने लोकार्पण करण्यात आले. यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षा दिपीका पेडणेकर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details