महाराष्ट्र

maharashtra

Explosion in Fireworks Market

ETV Bharat / videos

Explosion in Fireworks Market : फटाका बाजारात भीषण आग, 12 हून अधिक गंभीर, 20 दुकाने जळून खाक - माँट रोड

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 8:30 AM IST

मथुरा Explosion in Fireworks Market : मथुरा जिल्ह्यातील राया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माँट रोडजवळील गोपाल बागेत फटाक्यांच्या बाजार भरवण्यात आलं होतं. या बाजारात रविवारी दुपारी  शॉर्टसर्किटमुळं भीषण आग लागली. त्यामुळं जोरात स्फोट होऊ लागले. कुणालाही पळून जाण्याकरिता वेळही मिळाला नाही.  या घटनेत 12 हून अधिक जण गंभीर भाजले आहेत. तर 20 दुकानांसह अनेक वाहनंही जाळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत जळालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  जळालेल्या लोकांना पोलिसांच्या जीप आणि काही स्थानिक लोकांच्या वाहनातून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणासाठी शहरासह ग्रामीण भागातही फटाक्यांच्या बाजारपेठा सजल्या आहेत. यातील अनेक मार्केटमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था नाही. या घटनेत फटाके खरेदीसाठी आलेले लोकही भाजल्याचं एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details