महाराष्ट्र

maharashtra

दिवा रेल्वे स्थानकात महिलेचा गोंधळ

ETV Bharat / videos

Thane Local Railway News : लोकल थोडा वेळ थांबल्याने महिलेचा मोटरमनच्या केबिनमध्ये गोंधळ, पहा व्हिडिओ - महिलेचा मोटरमनच्या केबिनमध्ये गोंधळ

By

Published : Aug 9, 2023, 1:44 PM IST

ठाणे : दिवा जंक्शन असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचदा लोकल रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लोकल कमी वेळ थांबवली, या रागात एक महिला दिवा रेल्वे स्थानकामध्ये मोटरमन केबिनमध्ये घुसली.  आज सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास रेल्वे स्थानकात एका महिलेने थेट मोटारमनच्या केबिनमध्ये घुसून गोंधळ घातला.  गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत होती, तरी लोकल थोडाच वेळ का थांबवली? असा जाब महिलेने मोटारमनला विचारला. तिने तब्बल दहा ते पंधरा मिनिटे गोंधळ घातला. साडेसहाची लोकल उशिराने म्हणजे सात वाजता दिवा रेल्वे स्थानकात आली. रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी  प्रचंड गर्दी केली होती. लोकल कमी वेळ थांबवल्याने अनेकांना लोकलमध्ये चढता आले नाही. त्यामुळे संतापलेल्या महिलेने मोटारमनच्या केबिनमध्ये जाऊन त्याला जाब विचारला. या महिलेला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोंधळामुळे आज बाकीच्या गाड्या देखील उशीराने धावल्या आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details