Video पाहा, नंदुरबार पोलिसांची धडक कारवाई, अवैधरित्या विक्री होणारा लाखोंचा मद्यसाठा जप्त - मद्यसाठा जप्त
नंदुरबार गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मध्य वाहतुकीवर करडी नजर टाकली जात आहे. गेल्या आठवड्यात एक कोटी 70 लाखांचा अवैध मद्यसाठा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जप्त करण्यात आला district police seized illegal liquor होता. नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे आज जवळपास 42 लाखांच्या अवैध मद्यसाठा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जप्त करण्यात आला आहे. नंदुरबार तालुका पोलीसांनी गोपनीय माहीतीच्या आधारे तब्बल 42 लाखांचा दारुसाठा जप्त केला liquor worth of 42 lakh at Koparli आहे. कोपर्ली गावात विनापरवाना दारुसाठा करण्यात आला आहे. जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी मध्यरात्री तालुका पोलीस स्टेशनच्या मदतीने कोपर्ली गावात एका वस्तीत धाड टाकुन हा मद्यसाठा जप्त केला seized illegal liquor आहे. या प्रकरणी कोपर्ली गावातील रहिवाशी आणि म्हसावद येथील रहिवाशी असे दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या विदेशी बनावटीचे मद्यांना महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी गेल्या पंधरा दिवसांपासुन मद्यतस्करांविरोधात उघडलेल्या या मोहीमेने त्यांचे चांगलेच धाबे दणाणले police seized illegal liquor at Koparli आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST