Shiv Sena branch : शिवसेना शाखेवरून वाद शिंदे गट व ठाकरे गटात राडा - चेंबूर मध्ये ठाकरे गटात शिवसेना शाखेवरून वाद
शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये Thackeray group and Eknath Shinde group अनेक पातळ्यांवर वाद निर्माण झालेले पाहिला मिळाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखांवरून ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. मात्र मुंबईतील चेंबूर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येच ShivSena Uddhav Balasaheb Thackeray group शाखेवरून वाद झाला आहे. चेंबूरच्या कॅम्प परिसरात आजी माजी शाखा प्रमुखांच्यामध्ये राडा झाला आहे. शिवसेना शाखा १५४ चा ताबा नेमका कोणाकडे असेल यावरून हा वाद झाला. वादाची माहिती मिळतात चेंबूर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात दोन्ही बाजूची चौकशी केल्यानंतर प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटांमध्ये गेल्या चार महिन्यापासून अनेक वाद होताना पाहायला मिळतात. मात्र मुंबईत ठाकरे गटात शिवसेना शाखेबाबत झालेल्या वादाची दखल थेट शिवसेना भवनातून घेतली जाणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST