Bandhara Patharwala: जालना जिल्ह्यातील बंधारा पाथरवालातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू - औरंगाबाद जिल्ह्यात मोठा पाऊस
जालना - गेल्या चार दिवसांपासून पैठण, गेवराई, आणि अंबड तालुक्यातील काही भागात पाऊसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे अंबड तालुक्यातील पाथरवाला (बु), उच्च पातळी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. 4.500.मीटर उंची असलेल्या बंधाऱ्याची एकूण पाणीसाठा 6.760 दलघमी इतका आहे. परीसरात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यात 6.450 दलघमी म्हणजेच 95 टक्के पाणीसाठी असल्याने आज बंधाऱ्याचे 2 गेट उघडून त्यातून गोदावरी नदी पात्रात 11066 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी पत्राशेजारी असणाऱ्या शेकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST