Dilip Walse Patil : शरद पवारांची सभा झाली तर कार्यकर्त्यांना घेऊन स्वागताला जाईन - दिलीप वळसे-पाटील - Dilip Walse Patil Sharad Pawar
Published : Sep 15, 2023, 12:59 PM IST
पुणे : अजित पवार यांनी २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर आता पुन्हा पक्ष बांधणीसाठी शरद पवारांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. त्यासाठी ते राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात सभा घेणार असल्याची चर्चा सध्या रंगलीय. याबाबत अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. 'आंबेगाव तालुक्यात शरद पवारांची सभा झाली तर मी त्यांचं स्वागत करेन', असं वक्तव्य त्यांनी केलं. पाहा काय म्हणाले दिलीप वळसे-पाटील..