महाराष्ट्र

maharashtra

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी बनवला डोसा

ETV Bharat / videos

Priyanka Gandhi made Dhosa: काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी बनवला डोसा, पाहा व्हिडिओ - Priyanka Gandhi made Dhosa

By

Published : Apr 26, 2023, 4:26 PM IST

Updated : Apr 26, 2023, 4:36 PM IST

म्हैसूर (कर्नाटक) :काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्या काँग्रेसच्या प्रचारात व्यक्त आहेत. दरम्यान, त्यांनी प्रचारातून वेळ काढून आज चक्क डोसा बनवला आहे. येथील एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी डोसा बनवण्याचा आनंद घेतला आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख डी.के. शिवकुमार, पक्षाचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला आणि इतर काही जणांसह प्रियंका गांधी यांनी म्हैसूरमधील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक असलेल्या 'मायलारी हॉटेल'मध्ये नाश्ता करण्यासाठी गेल्या होत्या. इडली आणि डोसा खाल्ल्यानंतर प्रियांका यांनी डोसा बनवण्याची कला शिकण्याची इच्छा व्यक्त केली. यावर रेस्टॉरंटच्या मालकाने लगेच होकार दिला आणि त्यांना स्वयंपाकघरात ढोसा बनवण्यास सर्व काही साहित्य दिले. डोसा बनवण्यासाठी त्यांनी डोसा पिठाच्या तव्यावर ओतला आणि तो योग्य आकारात तो बनलवलाही. तो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Last Updated : Apr 26, 2023, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details