Dhananjay Munde Supporters Celebration : मंत्रीपद मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांचा जल्लोष, प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आनंद साजरा - धनंजय मुंडे समर्थक
सोलापूर - धनंजय मुंडे यांना राज्यात मंत्रीपद मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांनी शहरात त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करत जल्लोष साजरा केला. धनंजय मुंडेना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. ते सध्या सोलापुरात येऊ शकत नाहीत, मात्र त्याचा आनंद म्हणून आम्ही त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून आनंद साजरा करत असल्याची माहिती मुंडे समर्थक सनी देवकते यांनी दिली. धनंजय मुंडे जर सोलापुरात आले तर त्यांचा 5 हजार लिटर दूध आणून दुग्धाभिषेक करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यापूर्वी धनंजय मुंडे हृदयाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते, तेव्हा सोलापुरातील मुंडे समर्थकांनी ग्राम दैवत सिद्धेश्वर महाराज मंदिरात येऊन दंडवत घालत त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली होती. सोमवारी दुपारी धनंजय मुंडे समर्थकांनी शहरातील चार पुतळा येथे जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली गेली.