Devendra Fadnavis: पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांना शोधून काढत कारवाई करू- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis against
Home Minister Devendra Fadnavis नागपूर: पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले आहेत. यासंदर्भात आता कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांनी दिली आहे. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देशात महाराष्ट्रात कुठेही दिले असतील, तर त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई करू कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढू आणि कारवाई करू अशी माहिती त्यांनी दिली आहे. देश विरोधी कारवायांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा Popular Front of India पीएफआय सहभाग दिसून येत असल्याने देशभरात राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीसह एनआयए केंद्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसकडून राज्यभरात छापेमारी केली आहे. कारवाईच्या विरोधात पीएफआय समर्थकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केलं. त्यावेळी आंदोलकांच्या केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत चक्क पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले आहेत. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST