Devendra Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची काळजी घ्या, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन - Antarvali Sarati
Published : Oct 29, 2023, 6:26 PM IST
नागपूर Devendra Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या जवळच्या नागरिकांनी त्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ते रविवारी नागपूरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवावा, असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (29 ऑक्टोबर) पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी उपचारास नकार दिलाय. त्यामुळं उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे-पाटलांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांचे हात थरथरत होते. त्यांना नेहमीप्रमाणे बोलता येत नव्हत. सरकारकडून कोणताही प्रतिसाद किंवा संवाद झालेला नाही. आम्ही 30-31 ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करू. सरकारला माणुसकी कळत नाही. त्यानंतर आम्ही त्यांना उत्तर देऊ, असा इशारा जरांगे यांनी दिलाय.