महाराष्ट्र

maharashtra

Delhi Crime News

ETV Bharat / videos

Delhi Crime News : घराबाहेर पार्क केलेल्या बाईकची धडधडीत चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, Watch Video - राजधानी दिल्लीत मोटरसायकल चोरी

By

Published : Jul 24, 2023, 9:16 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मोटरसायकल चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीच्या बदरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोलारबंद भागातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये एक मोटारसायकल चोरीची घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॉलनीत घराबाहेर एक मोटारसायकल उभी असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात दोन जण येऊन रेकी करतात. यानंतर एका जण मोटरसायकलचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान रस्त्यावरील कुत्रेही भुंकताना दिसतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हे दोन्ही चोरटे मोटारसायकलचे कुलूप तोडून मोटारसायकलसह आरामात घटनास्थळावरून पलायन करतात. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री घडली. ही संपूर्ण घटना कॉलनीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहा या घटनेचा व्हिडिओ.

ABOUT THE AUTHOR

...view details