Crime News : 3 हजार रुपयांसाठी तरुणाची चाकूने भोसकून हत्या, पाहा धक्कादायक व्हिडिओ - 3 हजार रुपयांसाठी तरुणाची चाकूने भोसकून हत्या
नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीत भरदिवसा एका व्यक्तीची 3 हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओत आरोपी एका व्यक्तीवर चाकूने वार करत असल्याचे दिसत आहे. आजूबाजूचे लोक आधी त्याला थांबवण्यापासून कचरतात. मात्र नंतर त्याला थांबवले जाते तोपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. युसूफ अली (वय 21) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. युसूफच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलाचा मित्र शाहरुख याने तीन हजार रुपयांसाठी युसूफची हत्या केली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण तिगडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. पाहा या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ.