Deepak Kesarkar Met Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीवर मंत्री केसरकर काय म्हणाले... पाहा व्हिडिओ - मंत्री केसरकर शरद पवार भेट
Published : Oct 28, 2023, 10:43 PM IST
मुंबई Deepak Kesarkar Meets Sharad Pawar : राज्यात मराठा आरक्षणवरून (Maratha Reservation) राजकारण तापल आहे. मराठी शाळेतील गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या नृत्यावरून शरद पवार यांनी राज्याच्या शिक्षण विभागला लक्ष केले आहेत. शनिवारी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भेटीसंदर्भात पत्रकार परिषद घेत मंत्री दिपक केसरकर यांनी खुलासा केला आहे.
कोणतेही शाळा बंद होणार नाही: दिपक केसरकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी शाळेतील नृत्य कार्यक्रम बाबत बोलेल होतं. त्याबाबतची त्यांना वस्तुस्थिती त्यांना माहिती नव्हती ते त्यांना सांगितलं. त्यानंतर पवार यांनी मान्य केलं शाळेत नृत्य कार्यक्रम झाला नाही. त्यासोबतच त्यांना शाळा पायाभूत सुविधा विकसित करण्यासंदर्भात शासनाची भूमिका नेमकी काय याची सविस्तर माहिती दिली. त्यासोबत जिल्हा परिषद शाळांना सोयी सुविधा देता येतील याची देखील माहिती दिली. कोणतीही शाळा बंद होणार नाही. शाळातील सर्व शिक्षण संघटना समवते चर्चा केली.