Deepak Kesarkar कमी पटसंख्येची एकही शाळा बंद होणार नाही, अफवा पसरवली तर कारवाई -दीपक केसरकर - शिक्षण मंत्री दीपक केसरकर
Deepak Kesarkar कोल्हापूर 20 पटसंख्येच्या आतील कोणतीही शाळा बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला नाही. या केवळ अफवा आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांच्या तळाशी जाऊन त्यांच्यावर प्रसंगी कारवाई करू, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जातील, अशीही अफवा पसरली जात आहे. मात्र शिक्षकांना सर्विस ऍक्टनुसार प्रोटेक्शन असते. त्यामुळे अशी कोणतेही घटना घडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST