Deepak Kesarkar: बाळासाहेबांनी हे कदापी सहन केले नसते केसरकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावले - बाळासाहेबांनी हे कदापी सहन केले नसते
अहमदनगर ( शिर्डी ) :आजरामनवमीच्या दिवशी मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, सावकरांन विषयी अपमान कारक बोलले गेले तर राहुल गांधीं बरोबर आम्ही राहणार नाही. अशी रोखठोक भुमिका उध्दव ठाकरेंना घ्यायला हवी होती. उध्दव ठाकरेंना भाषणातुन केललं वक्तव्य हे केवळ वर वर दाखविण्यासाठीच असल्याचे मंत्री दिपक केसकर म्हणाले. मालेगावच्या सभेत उध्दव ठाकरेंनी राहुल गांधींनी सावरकर विषयी बोलु नये असे आव्हान केले होते. त्यानंतर राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आमच आलबेल असल्याच वक्तव्य केल. त्याचा शिवसेनेचे मंत्री दिपक केसरकर यांनी तिखट शब्दात समाचार घेतला. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना राऊत यांना नेहमीच अलबेल असते, ज्यांनी स्वाभीमान सोडला, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना सावरकरांव विषयी काय वाटण्याचे कारण आहे. उध्दव ठाकरेंनीही मालेगावच्या सभेत जाहीर केल ते वर वर दाखविण्याचा एक भाग आहे. खरोखरच त्यांना मनापासुन सावरकरांबदल प्रेम असत तर, त्यांनी सांगीतले असते की, यापुढे राहुल गांधी सावरकरांबद्दल काही बोलले तर आम्ही त्याच्या बरोबर राहणार नाही अशी भुमिका घेतली असती आणि बाळासाहेब असते तर त्यांनी कधीही सहन केले नसते असेही केसरकारांनी म्हटले आहे.