Diwali 2022 नांदेडमधील जगप्रसिद्ध गुरुद्वारात दीप उत्सव साजरा, पाहा व्हिडिओ - हिंदूच्या ५२ राज्यांची सुटका
Deep Utsav celebrated नांदेड नांदेडच्या तख्त श्री हुजूर साहिब या जगप्रसिद्ध गुरुद्वाऱ्यात आज दीपउत्सव साजरा करण्यात आला. या दीप उत्सवामुळे सचखंड गुरुद्वारा उजळून निघाला आहे. शीख धर्मियांचे गुरू हर गोविंदसिंघजी महाराज यांनी इ.स. १६०० शतकात ग्वालीयरच्या बंदी खान्यातून हिंदूच्या ५२ राज्यांची सुटका केली होती. पंजाब राज्यातील अमृतसर गुरुद्वारा येथे या दिवशी दीप लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्या दिवशी दिवाळी हा सण होता. तेव्हापासून दिवाळी सणात देशभरातील गुरुद्वाऱ्यात दीप उत्सव साजरा केला जातो. नांदेडमध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सचखंड गुरुद्वारा येथे दिवे लावण्यात आले होते. तसेच विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. दीप उत्सव आणि विद्युत रोषणाईने सचखंड गुरुद्वारा उजळून निघाला होता. या दीप उत्सवात देश विदेशातील भाविक सहभागी झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST